Web-Banner-1-24
जिंका 2.25 लाखापर्यंत बक्षिसे !
स्पर्धेचा विषयश्रीमद्भगवद्गीता अध्याय १८, श्लोक ६६ चा नेमका अर्थ काय?
आयोजकांकडून संदेश
मा. मंत्री, मा. खासदार ऍड. गणेशराव नागोराव दुधगांवकर जागतिक खुली वक्तृत्व स्पर्धा (वर्ष - द्वितीय)
मागच्या वर्षी आयोजित केल्या गेलेल्या या जागतिक खुल्या वक्तृत्व स्पर्धेला आपण दिलेल्या अफाट प्रतिसादाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत… यंदाच्या वर्षी देखील ही स्पर्धा आयोजित होत असून या वर्षीचा विषय: श्रीमदभगवदगीता अध्याय १८, श्लोक ६६ चा नेमका अर्थ काय? तेव्हा विषय नीट समजुन घेउन जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत सहभाग नोंदवावा…
समीर गणेशराव दुधगांवकर (शिंदे)
(M.S Mech Engg. USA.)
सन 2002 पासून श्रीमदभगवदगीता अभ्यासक
स्पर्धेच्या अभ्यासासाठी श्रीमद भगवद गीता डाउनलोड करा
9 सप्टेंबर | Video पाठवणे |
18 सप्टेंबर | स्पर्धकांची प्राथमिक फेरी |
21 सप्टेंबर | मुख्य स्पर्धेसाठी निवडलेल्या स्पर्धकांची यादी |
6 ऑक्टोबर | मुख्य स्पर्धा |
स्पर्धकांसाठी सूचना..!
आपले संपूर्ण नाव, गाव, वय, सोशल मिडिया अकाऊंट आयडी, WhatsApp मो. नं. इ. 94 2293 5407 वर पाठवुन नोंदणी करावी.
आपले वय दर्शवणारे शासकीय ओळखपत्र सुद्धा पाठवावे.
- स्वतःचा जास्तीत जास्त 15 मिनिटांचा (एडिट न केलेला) व्हिडीओ बनवून दि. 9 सप्टेंबर 2024 पर्यंत WhatsApp no 94 2293 5407 वर document file या फॉरमॅट मध्ये पाठवावा. व्हिडीओच्या सुरुवातीला “ज्ञानोपासक शिक्षण मंडळ परभणी तर्फे आयोजित मा. मंत्री मा. खासदार एडवोकेट गणेशराव दुधगांवकर (शिंदेशाहीराऊत) खुली वक्तृत्व स्पर्धा द्वितीय वर्ष यासाठी व्हिडीओ बनवत आहात”, हा उल्लेख करावा
- पाठविलेला व्हिडिओ प्रत्येकाने स्वतःच्या सोशल मिडिया (फेसबुक इ.) समाज माध्यमांवर टाकणे बंधनकारक आहे. जास्त व्हुज् असणाऱ्यांना डिजीवीर अवार्ड देण्यात येईल.
- 18 सप्टेंबर पर्यंत (मा. मंत्री, खासदार दुधगांवकर साहेबांची जन्मतारीख) निवडक स्पर्धकांचा एक प्राथमिक राउंड होईल. (VC व्हिडिओ कॉन्फ्रेंस व्दारे.)
- VC नंतर त्यातुन निवडलेल्या स्पर्धकांची अंतिम यादी 21 सप्टेंबरला जाहीर करण्यात येईल.
निवड झालेल्यांना दि. 6 ऑक्टोबर 2024 रोजी परभणीत होणाऱ्या अंतिम स्पर्धेत सहभागी व्हावे लागेल.